पदपथावर झोपलेल्या एका कचरा वेचकाच्या शरिरावरून बेदरकार मोटार गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अजय (२८) असे मृताचे नाव असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हा एका कचरा वेचकाकडे काही दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. परिसरातील कचरा वेचून तो उदरनिर्वाह करत होता. तसेच तो दररोज सिडको बसथांब्या लगत असलेल्या महाविद्यालयाच्या पदपथावर झोपायचा.
