मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक; शेवटची लोकल आज 10.50 वाजता, वेळापत्रक पाहाच

मध्य रेल्वेवर कर्नाक पुलाच्या कामासाठी रेल्वेकडून शनिवारी 25 जानेवारीला रात्री 11.30 पासून रविवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं त्याचा परिणाम लोकल सेवेवर होणार आहे. मेन लाइनवर सीएसएमटीहून धीम्या मार्गावर रात्री 10.50 वाजता टिटवाळा लोकल तर जलद मार्गावर 10.47 वाजता कसारा लोकल शेवटची असणार आहे. तर हार्बरवर पनवेलसाठी १०:५८ व गोरेगावसाठी १०:५४ वाजता शेवटची लोकल असणार आहे.

मेगाब्लॉक काळात प्रवाशांना लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळं मनस्ताव सहन करावा लागणार आहे. त्यामुळं शनिवारी रात्री व रविवारी सकाळी प्रवास करण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या आणि मगच प्रवासासाठी बाहेर निघा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *