‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर आता आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत. यावरून सोशल मीडियासह काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. या आक्षेपार्ह प्रसंगावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *