शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन पालक आक्रमक

जिल्हयात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जामोद येथील एका प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका शिक्षकाला विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन करताना पकडले. या प्रकारानंतर पालक अधिक आक्रमक झाले असून मुलांचे दाखले शाळेतून काढण्याचा पवित्रा घेतलाय.

२३ रोजी रात्रीच्यावेळी शाळेत कुजबुज ऐकू आल्यावर काही गावातीलच मंडळीनी आणि पालकांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेतील एक शिक्षक १३ वर्षांच्या मुलासोबत अश्लील वर्तन करताना सापडला.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी याबाबत तक्रार मुख्याध्यापक आणि संस्था अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली नाही.

या शिक्षकाचे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नित्याचेच अश्लील गैरवर्तन काही पालकांनी पाहिल्यानंतर शाळा संचालकांकडे तक्रार केली. मात्र, संबंधित शिक्षकावर कुठलीच कारवाई न केल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुलांचे शाळेतून दाखले काढण्याची मागणी केलेय.  हा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. याबाबत शिक्षण विभाग काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकारची तक्रार अनेक पालक शिक्षण अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती मिळत आहे. ही शाळा सरकारमान्य खासगी शाळा आहे. शाळेत सातवीपर्यंत वर्ग असून जवळपास ४०० विद्यार्थी शाळेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *