श्रीलंकेत सात भारतीय मच्छीमारांना अटक

श्रीलंकन नौदलाने शुक्रवारी सात भारतीय मच्छीमारांना काटचाथिऊच्या समुद्रातून अटक केली. आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे उल्लंघन करुन श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोप या मच्छीमारांवर ठेवण्यात आला आहे.

नौदलाने या मच्छीमारांकडून जीआरपीएसचे उपकरण आणि मासेमारी जाळी जप्त केली आहेत. अटक केलेले सर्व मच्छीमारा तामिळनाडूतील असून, त्यांना कानकेसंथुराई येथे नेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *