मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा अत्यंत भीषण आणि विचित्र म्हणता येईल असा अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल‌ झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *