शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मान्य केली आहे. आता ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
राज्यातील सोयाबीन खरेदीची मुदत ६ जानेवारीला संपली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला भाव मिळत नव्हता. हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून मुदतवाढीची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्राने ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून फडणवीस यांनी चौहान यांचे आभार मानले.
