भारतात पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्ती कॉलेज प्रिंसिपल होणार आहे. मानबी बंडोपाध्याय या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर वुमेन्स कॉलेजच्या प्रिसिंपल म्हणून धुरा सांभाळणार आहेत. मानबी सध्या विवेकानंद सतोवार्षिकी महाविद्यालयात बांगलाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येत्या 9 जूनपासून त्या कृष्णानगर वुमेन्स कॉलेजच्या प्रिंसिपल पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.
मानबी बंडोपाध्याय या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर वुमेन्स कॉलेजच्या प्रिसिंपल बनवण्याचा निर्णय कॉलेज सर्व्हिस कमिशनने घेतला. आम्ही कॉलेज सर्व्हिस कमिशनच्या निर्णयाला कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट या निर्णयाने आम्हाला आनंद झाला आहे, असे पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री प्रथा चॅटर्जी यांनी सांगितले.
आम्हाला अशा व्यक्तीची गरज होती, जी कॉलेजला उत्तम प्रकारे चालवू शकेल, असे कृष्णानगर वुमेन्स कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन आणि तांत्रिक शिक्षण मंत्री उज्वल विश्वास यांनी सांगितले.
मानबी यांचे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थीही प्रचंड आनंदात आहेत. “मानबी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्या अनेकांसाठी आदर्श आहेत.”, असे भूगोलच्या प्राध्यापक जयश्री मंडल यांनी मानबी यांच्याबद्दल बोलताना सांगितले.