कल्याण ते तळोजा सुरू होणार मेट्रो, ग्रामीण भागांनाही जोडणार, अशी असतील स्थानके

मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ तर वाचतो पण इंधनाचीही बचत होते. MMRDA ने आता ऑरेंज मेट्रो लाइन 12चे काम हाती घेतले आहे. या मेट्रोचे काम 31 डिसेंबर 2027 पर्यं पूर्ण होणे अपेक्षित असून कल्याण आणि तळोजा अशी दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. एकूण 23,756 किमीचा कॉरिडोर असणार आहे.

MMRDA ने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो लाइन 12ला दोन इंटरचेंज असणार आहेत. एक मुंबई मेट्रो लाइन 5वरील कल्याण APMC आणि दुसरा नवी मुंबई मेट्रो लाइन 1 वरील अमनदूत (तळोजा) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळं कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *