लसणाचे दर… वर्ष संपता संपता गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मागील काही महिन्यांमध्ये वाढत्या महागाईचा सामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसून आला. खाद्यतेलांच्या दरांपासून अगदी भाजीपाला आणि जेवणात वापरल्या जाणाऱ्या कांदा लसणाच्या दरांनीही सामान्यांना घाम फोडला. आता वर्ष संपता संपता सामान्यांच्याच जीवनावर परिणाम करणारी किंबहुना त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणारी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी आले लसणाच्या दरांबाबतची.

किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 400 रुपयांच्याही पलिकडे पोहोचले होते तर घाऊक बाजारात हेच दर साडेतीनशे ते चारशे रुपयांवर पोहोचले होते. लहान बाजारपेठांमध्ये दरांनी आणखी उंची गाठली होती. आता मात्र या लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *