बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी १९१ इतका होता. काही भागात ‘अतिवाईट’ तर, काही भागात ‘वाईट’ हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे.

बोरिवली येथे बुधवारी सायंकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०४ नोंदवला गेला. त्याचबरोबर देवनार, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २४३, २२१, २६५, २८६, ३००, २१७, २४७ इतका होता. असे वातावरण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याशिवाय भायखळा, मुलुंड, पवई परिसरातील हवा ‘मध्यम’ असल्याची नोंद बुधवारी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *