आरोपी विशाल गवळी सात दिवस पोलिस कोठडीत, रेल्वेने पोहोचला होता शेगावमध्ये

 कल्याणमधील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी हा मुलीची हत्या करून थेट शेगावला पोहोचला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव विशाल गवळी असून तो कल्याणचा रहिवासी आहे. विशाल गवळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली. या हत्येत विशालची पत्नी साक्षी हिने त्याची साथ दिली. तिलाही पोलिसांकडून न्यायालयात हजर केले असता तिला 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.

कल्याणच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. आता पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. कल्याणच्या चक्कीनाका परिसरात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तिची हत्या केली. हैराण करणारे म्हणजे आरोपीच्या पत्नीने त्याची साथ या गुन्हात दिली.
आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी ही बँकेत नोकरी करते. विशालने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर साक्षी ही घरी परतली. घरात तिने रक्त बघितले. यावेळी तिने घरात सांडलेले पूर्ण रक्त पुसून टाकले. हेच नाही तर रात्री विशालसोबत ती मृतदेह भरलेली बॅग घेऊन कब्रस्थानमध्ये पोहोचली. दोन्ही पती पत्नींनी ही बॅग तिथे फेकून दिली. यानंतर विशाल हा दादरहून थेट शेगावला निघाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *