सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

पंधरा-सोळा वर्षाचं नकळत वय. पण वाढदिवसाला आईने नवीन भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून गच्चीवर जाउन गळफास लावून घेत त्यांने जीवनच संपवून टाकले. ही घटना मिरजेत घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर मुलघा एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.  शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती. दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. या वाढदिवसाला त्यांने आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आई औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाउन संसाराचा गाडा हाकत असताना आर्थिक चणचणीमुळे एकुलत्या एका मुलाचा हट्ट ती पुरवू शकली नाही. यामुळे तो दोन दिवस उदास भासत होता. आज ना उद्या तो सुधारेल असे म्हणून आई व बहिण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आई व बहिण झोपल्यानंतर गङ्खीवर असलेल्या सौर उर्जेच्या अँगलला गळफास लावून त्यांने आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *