माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू

राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडाणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी संजय पांडे हे बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता, पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *