कराची- कारगिल युद्ध दरम्यान पाकिस्तानने भारताला अडचणीत आणले होते. भारत हे युद्ध कधीच विसरू शकत नाही, असे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाच्या एका कार्यक्रमावेळी बोलताना मुशर्रफ म्हणाले, ‘पाकिस्तानने कारगिल युद्धावेळी भारताला चांगलेच अडचणीत आणले होते. कारगिलमध्ये आम्ही चार ठिकाणांहून प्रवेश केला होता. मात्र, भारताला याबाबत काहीच माहित नव्हते. युद्धादरम्यान भारत फसला होता. भारत-पाकिस्तानमध्ये सन 1971 नंतर मे 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध सर्वांत मोठे होते. यामुळे भारत हे युद्ध कधी विसरू शकत नाही.‘
दरम्यान, मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची योजना आखली होती. यानंतर त्यांना नऊ वर्षे पाकिस्तानवर अधिराज्य गाजविले होते.