चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बँकांमध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती चीन, नेपाळ येथील सायबर फसवणूक करणाऱ्यांना देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (वय २६, रा. निलंगा जि. लातूर), आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (वय २६, रा. नरेशविहार, खोडा कॉलनी, गाझियाबाद), सतीश भगवान मोरे (वय ३५, रा. पोरवाल रोड, लोहगांव, मूळ-तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीला ट्रेडिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *