कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह

कांदिवली येथील एका नाल्यात १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. साईनगर परिसरातील एका नाल्यात शनिवारी काही पोती स्थानिकांना आढळून आली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तपास केला असता या गोण्यांमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची एक चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये प्रसृत झाली आहे. मृत कुत्र्यांचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. देशात गेल्या काही वर्षांत प्राण्यांबाबत क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुत्रे, कुत्र्यांची पिल्ले आणि मांजर यांना जिवंत जाळण्यात आल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *