बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, ‘राज ठाकरे काय…’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिंडोशीमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेमध्ये मनसेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नावही घेतलं जात नाही, असा टोला लगावत राज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेवरुन संजय राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंना सुनावलं आहे.

राज नक्की काय म्हणाले?

दिंडोशीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. “बाळासाहेबांचे फोटो लावून उद्धव ठाकरे मतं मागतात. उध्दव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेस, पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही,” असा टोला राज यांनी लगावला. याचाच संदर्भ देत राऊत यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. “महाविकास आघाडीच्या सध्या सभा होत आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे पण त्यांचं नावही घेतलं जात नाही अशी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते पंजाचा प्रचार करत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत,” असं सांगत राऊतांना यावर काय म्हणायचं आहे हे पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *