7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले…; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्रात पर्यटन विकास विभागाच्या भागात हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करुन डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले आहे. पण अद्याप या मृतदेह कुणाचा आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.

गोराईच्या बाबर पाडा येथील शेफाली गावाजवळ मृतदेहाचे तुकडे असलेली गोणी सापडली. ही गोणी झुडुपांमध्ये टाकण्यात आल्यामुळे मृतदेह कुजल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. यावेळी नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्यांना ही गोणी सापडली. गोणीत मृतेदह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं.

पोलिसांनी गोणी उघडताच त्यांना त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *