मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून लहानग्यांवर ‘हँड-फूट-माउथ’चं सावट पाहायला मिळत आहे. लहानांचं आजारपण पाहून चिंतेत असणारे अनेकजण यातून सावरत नाहीत, तोच आता एका नव्या संकटानं डोकं वर काढलं असून, शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या विळख्यात येताना दिसत आहेत. हे संकट सणासुदीच्याच दिवसांमध्ये घोंगावत असल्यामुळं अनेकांचीच चिंता वाढली आहे.
वातावरण बदलानं वाढवली चिंता
सध्या पावसानं पाठ सोडली असली तरीही हवामानात असणारा अती उकाडा, अधूनमधून असणारं ढगाळ वातावरण आणि सोबतच असणारं प्रदूषण या साऱ्यांमुळं काही आजारांनी शहरात डोकं वर काढलं आहे. मध्येच तापमानात होणारी घट या परिस्थितीत आणखी भर टाकताना दिसत आहे.
