मुंबई-ठाण्यातील झोपडीधारकांना दिलासा; खरेदीविक्री व्यवहार नियमित करण्यासाठी अभय योजना

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील झोपडीचे अनधिकृतपणे झालेले खरेदी-विक्री व्यवहार नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार हे व्यवहार नियमित करण्यासाठी एकवेळची अभय योजना राबविण्यात येणार असून त्याचा फायदा दोन्ही शहरांतील हजारो झोपडपट्टीवासीयांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बृहन्मुंबईतील, ठाण्यातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विविध कारणांमुळे मागील १५ ते २० वर्षांपासून रखडल्या असून, या झोपड्यांचा पुनर्विकास झालेला नाही. यामध्ये ठाण्यातील २९ झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा समावेश आहे. अशा प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांचे अंतिम परिशिष्ट-२ निर्गमित होऊन बराच कालावधी झालेला असून, सदर परिशिष्ट-२ मधील अनेक झोपडीधारकांचा दरम्यानच्या कालावधीमध्ये मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *