माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज, मातोश्रीवर परतले

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व चाचण्या पार पडल्यानंतर त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.

उद्धव ठाकरेंवर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी पार पडली. उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधीही त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या केल्या. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *