नाशिकच्या देवळाली कँम्पमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू झालाय. तोफेचा गोळा लोड केल्यानंतर त्याचा जागीच स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडलीये. यात 20 वर्षीय गोविंद सिंग आणि 21 वर्षीय सैफत शित या अग्नीवीरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील अग्नीवीरांची टीम फायर करत असताना ही दुर्घटना घटना घडली. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.
काय घडलं नेमकं?
तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास इंडियन फील्ड गनद्वारे फायर रेंज आर्टिलरी इथं अग्निवीरांचा सराव सुरू होता.
