मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; ‘या’ दिवसापासून अंमलबजावणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राज्य मंत्रिमंडळात  मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांसह मुंबईत  येणाऱ्या असंख्य वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी  करण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री 12 वाजेपासून लागू होणार आहे.

‘या’ 5 टोलनाक्यांवर टोलमाफी…

ऐरोली
वाशी
दहिसर
मुलुंड-एलबीएस
ठाणे (आनंदनगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *