मुंबईत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू; झोपेतच मृत्यूने गाठले

चेंबूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सिद्धार्थनगर येथे एका  घराला भीषण आग लागली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे बोलले जात आहे.

चेंबूर येथे सिद्धार्थनगर येथील घराला पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली होती. यावेळी घरात सर्व सदस्य होते. गुप्ता परिवारातील सर्व सदस्य असून त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला सांगण्यात आलं होतं. मात्र, अग्नीशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले त्यातच गुप्ता कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता परिवाराला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आग लागल्यानंतर सगळे घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळं त्यांना घराबाहेर पडता आलं नाही. तसंच, सर्व कुटुंब साखरझोपेत असातानाच आग लागली त्यामुळं त्यांना बाहेर पडणे कठिण झाले.

गुप्ता परिवार राहात असलेले घर हे दोन मजली होते. तळ मजल्याला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार,  शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आग भडकली असावी. तसंच सर्वजण झोपेत असल्यामुळं उशीर झाला व आगीने रौद्ररुप धारण केले. स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. सध्या अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *