कोल्डप्ले तिकीट कथित काळाबाजारी प्रकरण : बुकमाय शोच्या तक्रारीवरून ३० संशयितांविरोधात गुन्हा

कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट काळाबाजारीप्रकरणी बुक माय शोने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात काही संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किंमतीने विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीमध्ये कोणाचेही थेट नाव दिले नसले तरी ३० संशयितांची नावे, मोबाईल क्रमांकांचे मालक, समाज माध्यमांवरील खाते आणि संकेतस्थळ यांची माहिती देण्यात आली आहे. या संशयितांनी वाढीव दराने तिकीटांची पुनर्विक्री केल्याचा आरोप आहे. बुक माय शोच्या विधी विभागाचे महाव्यवस्थापक पूनम मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) आणि ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६(क) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *