“तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये…” फेक फोन कॉलमुळे मुलीच्या आईचा मृत्यू; कुठे घडली घटना?

“तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. आम्ही तिला ताब्यात घेतलं आहे. जर तिला सोडवायचं असेल तर एक लाख रुपये पाठवा.ठ असा फोन कॉल एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेला आला. ज्यानंतर या शिक्षिका प्रचंड तणावात आल्या. त्यांच्या हृदयावरचा ताण वाढला आणि हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी कुठल्याही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली नव्हती. मात्र डिजिटल अरेस्टच्या फेक कॉलमुळे या शिक्षिकेला तिचा जीव गमावावा लागला.

कुठे घडली आहे ही घटना?

डिजिटल अरेस्टची ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. डिजिटल अरेस्ट हा एक प्रकारचा फ्रॉड कॉलचा प्रकार आहे. सायबर गुन्ह्यांमधल्या गुन्ह्यात या घटनेची भर पडली आहे. आग्रा या ठिकाणी घटना घडली. पोलीस निरीक्षक दीपांशू राजपूत यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मालती वर्मा या शिक्षिकेचा डिजिटल अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांनी हेदेखील सांगितलं की ज्या कॉलरने मालती वर्मा यांना फोन केला त्याने स्वतः तो पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं. तसंच एक लाख रुपये द्या म्हणजे तुमच्या मुलीला आम्ही सेक्स रॅकेटमधून सोडवू अशी मागणी त्याने केली. वास्तवात हा फेक कॉल होता. मात्र घडलेल्या घटनेचा ताण येऊन मालती वर्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजपूत म्हणाले जेव्हा मालती वर्मा यांना हा फोन आला तेव्हा त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला होता. माझ्याशी त्यांचं बोलणं झालं. मी नंबर तपासला तेव्हा फेक नंबर आहे हे मला समजलं. त्यांना हा कॉल व्हॉट्स अॅपवरुन आला होता. मात्र या कॉलचा ताण सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असंही राजपूत यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *