एसबीआयचा कर्जदारांना दिलासा, व्याजदर घटवले

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची कपात केल्यानंतर लगेचच देशातील सर्वात मोठी बँक असणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात कपात करुन कर्जदारांना दिलासा दिला आहे.

स्टेट बँकेने ०.४० टक्क्यांची कपात करुन व्याज दर ९.३ टक्क्यांवर आणला आहे. पाच ऑक्टोंबरपासून ही व्याजदर कपात अंमलात येणार आहे.

स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या गृहकर्ज पुरवठा क्षेत्रातील मोठया बँकांवर व्याजदर कपातीचा दबाव वाढला आहे.

या निर्णयामुळे एसबीआय आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकांच्या व्याजदरातील तफावत वाढली आहे.

सध्या एसबीआयचा महिलांसाठीचा गृहकर्जाचा व्याजदर ९.७ टक्के आहे. अन्यांसाठी तो ९.७५ टक्के आहे. पाच ऑक्टोंबरपासून एसबीआयचे गृहकर्जाचे व्याजदर अनुक्रमे ९.३ टक्के आणि ९.३५ टक्के होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *