भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ अशी ओळख असणारे प्रवीण दीक्षित यांच्या खांद्यावर लवकरच राज्य पोलीस महासंचालक पदाची धूरा दिली जाणार आहे. प्रवीण दीक्षित सध्या एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आहेत.
सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या २ वर्षांपासून ते महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर दीक्षित हे राज्यातील ज्येष्ठ अधिकारी असल्यामुळे, साहजिकच त्यांच्याकडे महासंचालकपदाची जबाबादारी दिली जाणार आहे.
कोण आहेत प्रवीण दीक्षित?
– प्रवीण दीक्षित हे 1977 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत
– सध्या ते लाचलुचपत विभागाचे महासंचालक आहेत
– सर्वाधिक लाचखोरांना गजाआड केल्याची त्यांची ख्याती आहे
– अजित पवार, सुनील तटकरे यांनाही कारवाईला सामोरं जावं लागलं

