पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 42 लोकांना चावा घेतला आहे. यामध्य अनेक लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
या सर्व जखमींना मंचरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने या सर्वांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
पिसळलेल्या कुत्र्याने सर्वात जास्त लहान मुलांना चावा घेतल्याचे समजते आहे. या पिसळलेल्या कुत्र्यांमुळे ग्रामस्थांनी मात्र चांगलाच धसका घेतला आहे.

