बिग बाझारमध्ये बुरशी लागलेले पदार्थ

बिग बाझारमध्ये बुरशी लागलेले पदार्थ

बिग बाझारमध्ये निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. अमूल बटर, बटाटे, हिरवा वाटाणा यासारख्या पदार्थांना बुरशी लागूनही ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

हरजीत सिंह वाधवा हे बिग बाझारमध्ये खरेदीसाठी गेले असता, त्यांना बऱ्याचशा पदार्थांना बुरशी लागल्याचं आढळून आलं. अमूल बटर, बटाट्यांना बुरशी लागली होती, तर पॅकबंद हिरवे वाटाणे ही अक्षरशः पिवळे पडलेले होते. त्यांना घाणेरडा वास येत होता.amul fungus

वाधवा यांनी ताबडतोब अन्न आणि औषध प्रशासन विभागाला याची तक्रार केली.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पदार्थांचे नमूने ताब्यात घेतले आहेत. बिग बझार प्रशासनाने यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या निमीत्ताने सणासुदीच्या दिवसात ग्राकहांशी होत असलेली फसवणूक समोर आली आहे.

दरम्यान अन्न औषध प्रशासनानं नियमित तपासणीसाठी नमुने घेतल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *