जाचक अटींमुळे गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे परवाना दूरच

सलग पाच वर्षे मंडप परवाना मिळविण्यासाठी गेल्या दहा वर्षांत मंडळावर एकदाही कारवाई न होण्याची अट यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळांना जाचक ठरण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणांकडून एकदाही कारवाई न झालेली मंडळेच कमी आहेत. त्यामुळे बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षे मंडप परवाना मिळणे दुरापास्त ठरणार आहे.

या संदर्भातील शासन निर्णयात बदल करण्याची मागणी होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या शिफारसीप्रमाणे शासन निर्णयात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला पाठविण्यात येईल. मात्र, या प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे यंदा तरी मंडळांना सलग पाच वर्षांच्या मंडप परवान्यास मुकावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *