उजनी धरण शंभरीच्या दिशेने, भीमा नदीत धरणातून पाणी सोडले; पंढरीत पुराचा धोका

 सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ४० हजार क्युसेक तसेच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक असे मिळून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *