५०० रेल्वे स्थानकावर गुगल देणार वाय-फाय

५०० रेल्वे स्थानकावर गुगल देणार वाय-फाय

इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल भारतातील १०० रेल्वे स्थानक परिसरात वाय-फाय हॉट स्पॉटची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

पुढच्यावर्षी भारतातील आणखी ४०० स्थानकांवर गुगलकडून अशी सुविधा सुरु करण्यात येईल. अमेरिका दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुगल कंपनीला भेट दिली. त्यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.

अँड्राॅईड वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेत टाईप करता यावे यासाठी गुगल दहा स्थानिक भाषांची टायपिंग प्रणाली विकसित करणार असल्याची माहीती गुगलने यावेळी दिली.

या घोषणांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत गुगल मुख्यालयातील विविध विभागांमध्ये फिरले. तिथली कामाची कार्यपध्दती, सुरु असलेले संशोधन कार्य याची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *