उल्हासनगरमध्ये पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला, श्वान मालकावर गुन्हा दाखल

आपल्या पाळीव श्वानाची योग्य सुरक्षितता न घेता, बाहेर फिरण्यास सोडलेल्या श्वानाने शेजारच्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. हल्ला झालेल्या महिलेने याप्रकरणी तक्रार केल्याने पोलिसांनी श्वान मालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला.

महेश पुनवाणी (४८, रा. बॅरेक क्रमांक ५४७, सोन्नार गल्ली, उल्हासनगर-२) असे पाळीव श्वान मालकाचे नाव आहे. कोमल सुरेश नागदेव (४८) असे श्वान हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या सोन्नार गल्ली भागात राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *