खेड – आंबवली मार्गावरील कुडोशी येथे रस्त्यावर आलेल्या गाईंना वाचविण्यासाठी ब्रेक केल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एस. टी. बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. हा अपघात दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
खेड आगरातून दुपारी ३ वाजता सुटणारी खेड वडगाव गाडी (क्रमांक : एम एच २० बी एल ०४६१) घेऊन चालक बी. एम. घुगे आणि वाहक बी. एस. सोनकांबळे घेऊन निघाले गाडी भरणे येथील सहा विद्यार्थ्याना घेऊन जात असताना. कुडोशी येथे रस्त्यावर आडव्या आलेल्या गाईंना वाचविण्यासाठी चालक घुगे यांनी ब्रेक केला असता गाडी रस्त्याच्या बाजूला उलटून अपघात झाला. नेहमी गर्दीने भरून जाणाऱ्या वडगाव गाडीच्या आगोदरच गुरुवारी नंदिवली एस.टी.बस सुटल्यामुळे या गाडीला प्रवाशांची संख्या तुरळक होती. यामुळे अनर्थ टळला. या अपघातात साक्षी भागूराम तांबे ( वय -१७.रा.किंजळे ), दिक्षा गांजेकर ( वय -१७. रा.कांदोशी ) या दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना येथील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
