शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद

मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं शनिवारी लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तर, काही एक्सप्रेसलाही त्याचा फटका बसणार आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. त्यामुळं शनिवारी कसं असेल लोकलचे वेळापत्रक जाणून घेऊया.

कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीच मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 12.30 पासून पहाटे 4.30 वाजेपर्यंत असा चार तासांचा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळं सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड अशा लोकल सेवा बंद असणार आहेत. तसंच, मेगाब्लॉकमुळं इतर लोकल व एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *