कॉफी प्या मनसोक्त, कॉफीसेवनाचा हृदयविकाराशी संबंध नाही!

कॉफी प्या मनसोक्त, कॉफीसेवनाचा हृदयविकाराशी संबंध नाही!

कॉफी पिण्याचा आणि हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा विकार (अॅट्रिअल फायब्रिलेशन) यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचा निष्कर्ष नुकताच एका संशोधनातून समोर आला आहे. अतिरिक्त कॉफीसेवनामुळेही हा आजार बळावत नसल्याचं प्रमुख संशोधक सुसाना लार्सन यांनी स्पष्ट केलं आहे.

तब्बल 12 वर्ष दोन गटांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही कॉफीसेवन आणि हृदयविकाराचा संबंध नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे कॉफीप्रेमी निर्धास्तपणे त्यांच्या आवडत्या पेयाचं मनसोक्त सेवन करु शकतात.

अर्थात तुमच्या हृदयावर कॉफीचा परिणाम होत नसला तरी अतिकॉफीसेवनामुळे इतर साईड इफेक्ट्स जाणवू शकतात, ही बाबही यात नमूद करण्यात आली आहे. हे संशोधन जर्नल बायोम्ड सेंन्ट्रलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *