नितेश राणे यांनी उच्चारलेला रोहिंग्या-बांगलादेशी शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारा नाही, पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा

मीरा रोड येथे जानेवारीमध्ये उसळलेल्या हिसांचारानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन यांनी भाषण करताना वापरलेले रोहिंग्या, बांगलादेशी हे शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारे नाहीत. त्यामुळे, त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात मांडली.

राणे आणि जैन यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी कृत्य केल्याच्या आरोपाप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील, मानखुर्द येथे दाखल गुन्ह्यात हेतुत: धार्मिक भावना दुखवण्याशी संबंधित कलम जोडण्यात आले असून अन्य गुन्ह्यात ते लावलेले नाही, असे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *