आता अंधांनाही बनावट नोट ओळखता येणार

आता अंधांनाही बनावट नोट ओळखता येणार

रिझर्व्ह बँकेने अंधांच्या मदतीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 100, 500, आणि 1000 च्या नोटांवर आता ब्रेल लिपीसारखी खूण असेल. आतापर्यंत 100 च्या नोटीवर महात्मा गांधींच्या वॉटरमार्कसह चार समांतर रेषा असत. मात्र, आता 500 च्या नोटीवर अशा 5 रेषा आणि 1000 च्या नोटीवर 6 रेषा असणार आहेत.

या रेषांना स्पर्श केल्यानंतर ती नोट किती रुपयांची आहे, हे अंध लोकांना कळू शकणार आहे. शिवाय, रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नोटीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

शिवाय, रिझर्व्ह बँकेने या नोटीवरील खूणेचा आकार 50 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे अंध लोकांनाही खऱ्या आणि बनावट नोट ओळखता येणार आहे. या नव्या बदलाबाबत रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकाना माहितीही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *