रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीविरोधात केईएमच्या डॉक्टरांनी आज सलग दुसऱ्या दिवशीही संप कायम ठेवला आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दरम्यान, संप मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा ग्राहक मंचानं दिला आहे.
काल उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी 3 डॉक्टरांना बेदम मारहाण केली. यामुळे तिन्ही डॉक्टरांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डेंग्यू झालेली एक मुलगी उपचारादरम्यान कोमात गेली. यामुळे नातेवाईकांनी चक्क डॉक्टरांनाच मारहाण केली.
डॉ. सुहास चौधरींना मारहाणीतून सोडवण्यासाठी गेलेल्या डॉ. कुशल आणि डॉ. पुनील यांनाही रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. यामुळे संतप्त डॉक्टरांनी कालपासून संप पुकारला आहे.

