विद्यार्थ्यांना जीन्स किंवा टी शर्टवर प्रवेश नाही! मुंबईतल्या प्रसिद्ध कॉलेजचा नवा फतवा

काही राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कपडे परिधान करण्यावर बंधने आली होती. आता हे लोण मुंबईतल्या कॉलेजांमध्येही पसरल्याचे दिसतंय. मुंबईतील आचार्य मराठे कॉलेज वेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे. या निर्णयावरुन त्यांच्यावर चहुबाजूने टिका होतेय. काय आहे हा निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.

चेंबूर येथील एन.जी आचार्य मराठे कॉलेजने हिजाब, बुरखा, नकाब, टोपी यावर बंदी घातली होती. या निर्णयानंतर कॉलेजवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान कॉलेज मॅनेजमेंटने आता आणखी एक नवीन फतवा जाहीर केलाय. त्यानुसार यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किवा टी शर्ट विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घालून येता येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *