मागासवर्गीयांच्या वाट्यास अर्थसंकल्पात केवळ घरकुले

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला व शेतकऱ्यांना भरभरून दिले असताना अनुसूचित जातीच्या वाट्यास मात्र घरकुल योजना वगळता नवे काहीच आलेले नाही. आवास व घरकुल योजनेसाठी ७,४२५ कोटी रुपयांची ही एकमेव मागासवर्गीयांसाठीची भरीव तरतूद आहे.

निराधार, विधवा, अपंग तसेच वृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजनेतून दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामध्ये आता पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या योजनेचे राज्यात ४५,६०,००० लाभार्थी असून त्यावर प्रतिवर्ष ७ हजार १४५ कोटी खर्च होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *