मुंबईतील शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू प्रवाशांच्या जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच या पुलाची दुरावस्था झाली आहे. अटल सेतू पुलावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. अटल सेतू पुलावरावरची माती खचायला लागली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टला रोडला गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आता महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अटल सेतू पुलाची सहा महिन्यांत माती खचायला लागली आहे. पुलाला तडे जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोलेंनी अटल सेतू पुलाला तडे गेल्याची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली तर, याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणालेत.

