‘गो गोवा गॉन’; पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपीला पकडलं, विमानतळावर येताच गोवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उत्तर प्रदेशमध्ये अटक केलेल्या एका गुन्हेगाराला गोवा पोलीस गोव्याला घेऊन जात होते. मात्र अटक केलेला हा ३२ वर्षीय इसम मुंबई विमानतळावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला आहे. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र त्याला पकडू शकले नाहीत. गुन्हेगार निसटल्यानंतर पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, इमाद वसीम खान याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला गोव्याला आणलं जात होतं. बुधवारी सकाळी ६ वाजता गोवा पोलिसांचं एक पथक इमादला घेऊन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. मुंबई विमानतळावर असताना तो पोलिसांच्या हातून निसटला. इमादविरोधात गोव्यात काही लोकांना बंदिस्त करणे, मारहाहण करणं, तोतया शासकीय अधिकारी बनून लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *