नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदार…, स्मिता वाघ ,जळगाव, भाजप

महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष केलेल्या जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांचा सामाजिक व राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून अध्यक्षपद, विधान परिषद सदस्य आणि आता खासदार अशी मजल त्यांनी मारली आहे.

पक्षाने एकदा दुखावूनही वाघ या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ त्यांना मिळाले. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाघ यांना उमेदवारी जाहीर करून नंतर अचानक रद्द केली होती. वेळात वेळ काढून दिवसभरात दोन तास तरी वाचनासाठी देणाऱ्या स्मिता वाघ यांचे माहेर नाशिकचे तर सासर जळगामधील. त्या कला शाखेत (मानसशास्त्र) पदवीधर आहेत. माहेर आणि सासर दोन्हींकडून त्यांना राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *