पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला आहे. ही गाडी सियालदहला जात असल्याची माहिती आहे. ही गाडी निजबारीसमोर उभी असताना भरधाव वेगात असलेल्या मालगाडीने पाठीमागून धडक दिली. ज्यामध्ये गाडीची तीन डबे रुळावरुन उतरले तर एका डब्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गाडीच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *