‘भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय’, संजय राऊतांचा घणाघात

जित पवार यांच्यासोबतच्या युतीपासून मणिपूरमधील (Manipur Voilence) अशांततेपर्यंतच्या मुद्द्यांवर मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात भाजपच्य़ा मातृक संस्थेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे. एकिकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य आणि त्यामागोमागच संघाच्या मुखपत्रात केलेला उल्लेख पाहता आता विरोधी पक्ष आणि नेतेमंडळींनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करत संघानंच भाजपला नैतिक ताकद दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला.

भाजप आणि शिवसेनेची युती तुटली नाही पाहिजे असंही संघानं सांगितलं होतं, कधीकाळी हाच संघ भाजपची मातृक संस्था होती. पण, आता मात्र भाजपनं संघाला संपवण्याचं ठरवलं आहे, असं संजय राऊत परखडपणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *