वसईमध्ये गणेश उत्सवात धांगडधिंगाणा आणि बीभत्स डान्सचा प्रकार गणेश उत्सवात पाहायला मिळाला. अनेकांनी स्टेजवर पैशाचा नोटाही उडवल्यात. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलिसांना रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला अश्लील डान्स आणि आवाज पोहोचला नाही.
गणपती उत्सवात नृत्य करण्यास काहीही हरकत नाही. मात्र, नृत्याचा धांगडधिंगाणा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. मोठ्या आवाजात गाणी सुरु होती. तरीही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. बीभत्स डान्सवर अनेकांनी ठेका धरला आणि पैशाच्या नोटाही भिरकवल्यात.
