केंद्रात भाजपप्रणित एडीएची सत्ता येत असतानाच विरोधी पक्षातील नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या काही भूमिकांवरल जाहीरपणे प्रश्न उपस्थित केले आहेत. (INDIA Alliance) इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर मुसलमानांना आरक्षण देतील, अशा प्रकारे मोदींनी हिंदुंना चिथवण्याचा प्रयत्न केला. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजुने आहेत, यावर मोदींचं म्हणणं काय? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. झी 24तासच्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘नरेंद्र मोदी किती ढोंगी आहेत… नरेटीव्ह नरेटीव्ह म्हणताय ना? इंजिया आघाडी, काँग्रेस सत्तेवर आली तर ते मुस्लिमांना आरक्षण देतील अशी त्यांनी हिंदूंना चिथवण्याची भाषा केली. आज चंद्राबाबू नायडू आणि खुद्द नितीश कुमार हे मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजूने असून, आपआपल्या राज्यांमध्ये त्यांची ती भूमिका आहे. याच्यावर मोदींचं म्हणणं काय? हिंदुत्ववादी मोदी म्हणतात ना स्वत:ला? आम्ही सत्तेवर आलो, तर मुसलमानांना आरक्षण देतील हे, ही भाषा एखाद्या प्रधानमंत्र्यांना शोभते का?’ हा बोचरा सवाल त्यांनी केला.
